कु ब न प सार्वत्रिक निवडणूक 2022 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्व साधारण (महिला) आरक्षण सोडत जाहीर

कु ब न प सार्वत्रिक निवडणूक 2022 
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्व साधारण (महिला) आरक्षण सोडत जाहीर 

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (ता.२८) ओबीसी आरक्षण सोडत जाहीर होणार झाली आहे.या आरक्षण सोडतीत ओबीसीसाठी १३ जागा निश्चित करण्यात आल्या असून त्यापैकी ६ जागा या ओबीसी महिलांसाठी आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी २६ जागा असून त्यापैकी १२ जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. 

गुरुवारी (ता.२८) कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कात्रप येथील सभागृहात उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे -पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आरक्षण सोडत काढण्यात आली. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे व सामान्य प्रशासन विभागाचे सिद्धार्थ पवार यांनी त्यांना यासाठी सहाय्य केले. या आरक्षण सोडतीत ओबीसींसाठी प्रभाग क्रमांक ३, ४,७,१३, १९ व २१ या प्रभागातील १-१ जागा आरक्षित झाली आहे. तर ओबीसी महिलांसाठी प्रभाग क्रमांक ५,८१५,१६, १८, २० व २४ या प्रभागातील १-१ जागा आरक्षित झाली आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रभाग क्रमांक १,३,४,७,१०,११,१३१४,१७,१९,२१व २३या प्रभागातील १-१ जागा आरक्षित करण्यात आली आहे. २२ जुलै रोजीच्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. ही आरक्षण सोडत काढताना यापूर्वी जाहीर झालेल्या अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षित झालेल्या जागा कायम ठेवून उर्वरित जागांमधून २७ टक्के जागा या ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्याचप्रमाणे महिलांसाठी ५० टक्के जागा निश्चित करण्यात आल्या. त्यामध्ये यापूर्वी जाहीर झालेल्या अनुसूचित जाती- जमातीच्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या जागा व ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागांचाही समावेश असल्याचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितले.

बॉक्स: 

कुळगाव बदलापूर अ वर्ग नगर परिषद आहे. प्रभाग रचनेनुसार कुळगाव बदलापूर नगर परिषदेत ४९ सदस्य  निवडून जाणार आहेत. या नगर परिषदेत अनुसूचित जातीसाठी ७ व अनुसूचित जमातीसाठी २ जागा आरक्षित  आहेत.

Popular posts from this blog

कुळगांव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Ryan International School, Ambarnath celebrated the 75th Independence Day