कथित दरोड्या प्रकरणी न्यायालयाने आशिष दामले यांच्या सह १८ जणांची केली निर्दोष मुक्तता; दोषी ठरवलेल्या प्रकरणात प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स ऍक्ट अनव्ये केली 15 हजारांच्या जात मुचल्यावर सुटका
* बदलापूर :- बदलापूर येथील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व मा. नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांच्या विरोधात दंगल आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल आला असून कथित दरोड्या प्रकरणी न्यायालयाने आशिष दामले यांच्या सह १८ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश शौकत गोरवाडे न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी नुकतीच संपन्न झाली. या प्रकरणाचा निकाल देताना न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी कॅप्टन आशिष दामले यांना भा. दं. वि. कलम ३२३,४२७ ४५२, व १४९ सह या आरोपाखाली दोषी ठरविण्यात आले असून तूर्तास कोणतीही शिक्षा न करता १५ हजारांच्या जात मुचल्यावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तीन वर्षांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे व शांतता भंग न करण्याचे आदेश दिले आहेत. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आशिष दामले व त्यांच्या सहकार्यांवर ३९५ (दरोडा) व ३६३ (अपहरण) सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु हा गुन्हा राजकीय दबावापोटी दाखल करण्यात आला असल्याचा आरोप कॅप्टन आशिष दामले यांनी क...