कथित दरोड्या प्रकरणी न्यायालयाने आशिष दामले यांच्या सह १८ जणांची केली निर्दोष मुक्तता; दोषी ठरवलेल्या प्रकरणात प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स ऍक्ट अनव्ये केली 15 हजारांच्या जात मुचल्यावर सुटका

*
बदलापूर :- बदलापूर येथील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व मा. नगरसेवक  कॅप्टन आशिष दामले यांच्या विरोधात दंगल आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल आला असून कथित दरोड्या प्रकरणी न्यायालयाने आशिष दामले यांच्या सह १८ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश शौकत गोरवाडे न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी  नुकतीच संपन्न झाली. या प्रकरणाचा निकाल देताना न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी कॅप्टन आशिष दामले यांना भा. दं. वि. कलम ३२३,४२७ ४५२, व १४९ सह या आरोपाखाली दोषी ठरविण्यात आले असून तूर्तास कोणतीही शिक्षा न करता १५ हजारांच्या जात मुचल्यावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तीन वर्षांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे व शांतता भंग न करण्याचे आदेश दिले आहेत.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आशिष दामले व त्यांच्या सहकार्यांवर ३९५ (दरोडा) व ३६३ (अपहरण) सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु हा गुन्हा राजकीय दबावापोटी दाखल करण्यात आला असल्याचा आरोप कॅप्टन आशिष दामले यांनी केला होता व न्यायालयाने दिलेल्या निकालाने हे स्पष्ट झाले आहे.१ लाख रुपये करिता दरोडाचा आरोप केला होता पण सी सी टी व्ही आणि साक्षीदारांच्या साक्षीतून  जागेवर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे व सबळ पुरावा सापडल्या नसल्याकारणाने न्यायालयाने सदोष पुराव्या अभावी आशिष दामले व इतर सहकाऱ्यांना दोष मुक्त केले आहे.
  न्यायालयाने आशिष दामले यांना भा. दं. वि. कलम ३२३,४२७ ४५२, व १४९ सह या आरोपाखाली दोषी ठरविले आहे. परंतु न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे की, आशिष हा तरुण आहे. त्याचा कोणताही गुन्हेगारी पूर्ववर्ती भाग नाही. अटी लादून एकाच प्रकारच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती प्रतिबंधित केली जाऊ शकते. आरोपी आशिष विरुद्ध सिद्ध झालेला गुन्हा मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा नसल्यामुळे त्याला प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स ऍक्ट 1958 चा लाभ मिळू शकतो. तसेच फिर्यादी नरेश यांच्या मालमत्तेचे झालेले नुकसान दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे  आशिषलाही भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.
(Accused Aashish is a youth. He has no criminal antecedents. The repetition of same type of offence can be restricted by imposing conditions. As the offence proved against accused Aashish is not punishable with death or life imprisonment, the benefit of the Probation of Offenders Act 1958 can be given to him. Similarly, the damage caused to the property of PW1 Naresh cannot be ignored. Hence, compensation can also be directed to be paid by accused Aashish.)
हरीश घाडगे, संतोष कदम, संकल्प लेले, वसंत लंघी, योगेश पाटील, उमेश लोखंडे, केतन शेळके, कौशल वर्मा, युवराज गीध, गणेश सोहनी, दीपक लोहिरे, पांडुरंग राठोड, राम लिहे, प्रज्वल तांबे, कुणाल राऊत, अमृत थोरात, धैर्यशील एजागज, हर्षल जाधव या हल्लेखोरांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे  ॲड. संगीता फड यांनी तर  आरोपींतर्फे ॲड. ए. वाय. पत्की यांनी काम पाहिले. निकालात न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आरोपी आशिष आनंद दामले हा भादंवि कलम 147, 323, 427 आणि 452 च्या कलम 149 नुसार शिक्षापात्र असलेल्या गुन्ह्यासाठी दोषी ठरला आहे आणि त्याला तात्काळ कोणतीही शिक्षा सुनावण्याऐवजी, त्याला बाँडमध्ये प्रवेश केल्यावर सोडण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत.

Popular posts from this blog

कु ब न प सार्वत्रिक निवडणूक 2022 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्व साधारण (महिला) आरक्षण सोडत जाहीर

कुळगांव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Ryan International School, Ambarnath celebrated the 75th Independence Day