शिंदे सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; डॉ. बालाजी किणीकर यांना संधी मिळणार ?
अंबरनाथ :- शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळ स्तराची लगबग सुरू झाली असून मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळेल याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे अशावेळी अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात सत्ताबदल करणारे एकनाथ शिंदे यांचे मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी संभव्य मंत्र्यांची यादी समोर आली असून, यामध्ये भाजपचे आठ आणि शिंदे गटाचे सात मंत्री पदभार स्वीकारणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजप गोटातील संभाव्य मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, रवि चव्हाण, बबनराव लोणीकार, नितेश राणे यांचा नावाची चर्चा आहे. तर, या विस्तारामध्ये शिंदे गटातील सर्व माजी मंत्री शपथ घेणार असून यात दाद भूसे, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराजे देसाई, संदीपान भुमरे, डॉ बालाजी किणीकर, अब्दुल सत्तार, बच्चू कडू किंवा रवि राणा आदींच्या नावाची चर्चा आहे.