बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तिरंगा ध्वजाचे वितरण, जास्तीत जास्त नागरिकांनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

बदलापूर :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात,देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या इतिहासाचे अभियानपूर्वक संस्मरण करण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amrit Mahotsav) अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘हर घर तिरंगा’ (Tricolour every house) हे अभियान राबविण्यात येत आहे.
हर घर तिरंगा अभियान अंतर्गत देशातील प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या घरावर तिरंगा ध्वज लावला पाहिजे, याकरिता बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तिरंगा ध्वजाचे वितरण हे करण्यात येत आहे. तिरंगा ध्वजाचे मुफ्त वितरण सुरू आहे आहे. पक्षातर्फे  शहरात ८००० तिरंगा ध्वज वितरित करण्यात येणार आहेत. 
आपल्या भारत देशातील प्रत्येक कुटुंबाने या Har Ghar Tiranga Campaign अंतर्गत सहभागी व्हायचे आहे. असे आवाहन  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन  आशिष दामले यांनी केले आहे.तसेच बदलापूरवासियांनी हा तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक फडकवावा असे  आवाहन करण्यात आले आहे. 
हर घर तिरंगा मोहीम (Har Ghar Tiranga Campaign) हे आपल्या संपूर्ण भारत देशात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. तसेच आपल्या संपूर्ण भारत देशातील नागरिकांना 2 ऑक्टोबर पासून सोशल मीडियावरील प्रोफाइल फोटोला तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Popular posts from this blog

कु ब न प सार्वत्रिक निवडणूक 2022 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्व साधारण (महिला) आरक्षण सोडत जाहीर

कुळगांव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Ryan International School, Ambarnath celebrated the 75th Independence Day