विनायक मेटे यांचे अपघाती निधन

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते 52 वर्षाचे होते. एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

मुंबईच्या दिशेने येताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीला अपघात झाला. माडप बोगद्यात ही दुर्घटना घडली. सकाळी 5 वाजता हा अपघात झाला. अपघातात मेटे यांना हात-पाय आणि डोक्याला मार लागला होता. अपघातानंतर जवळपास तासभर मदत मिळाली नाही, खूप वेळ फोन करूनही पोलिस वेळेवर पोहोचले नाहीत, अशी माहिती मेटेंच्या सहका-यांनी दिली.


Popular posts from this blog

कुळगांव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

कु ब न प सार्वत्रिक निवडणूक 2022 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्व साधारण (महिला) आरक्षण सोडत जाहीर

Ryan International School, Ambarnath celebrated the 75th Independence Day