राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी विनय सरदार
बदलापूर :- येथील बदलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी विनय सरदार यांची निवड करण्यात आली आहे. आपला व्यवसाय सांभाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सक्रिय सहभाग नोंदविणारे विनय सरदार हे कॅप्टन आशिष दामले यांचे खंदे समर्थक मानले जातात. अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक उपक्रमामध्ये आणि आंदोलनामध्ये विनय सरदार यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे.
माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी पक्ष श्रेष्ठींनी टाकली आहे तिला पात्र होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. येत्या कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत पक्षाला जास्तीत जास्त यश कसे मिळेल यासाठी जीवाचे रान करणार आहे. त्यासाठी आत्तापासून कामाला लागणार असल्याचे विनय सरदार यांनी यावेळी सांगितले.
युवकचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. विनय सरदार यांना पुढील वाटचालीस आशिष दामले यांनी शुभेच्छा दिले असून विनय सरदार यांच्यावर सर्वसाधारण अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.