गणरायाचं आगमन होताच वरुण राजाचीही हजेरी

 आज घरोघरी गणरायाचे वाजतगाजत आगमन होताच वरुण राजाने गणपती बाप्पाचे ( Imd Mumbai Issued Warning ) धुमधडाक्यात स्वागत केले आहे. सायंकाळी 7च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुढील तीन ते चार तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा मुंबई हवामान विभागाने संध्याळी सव्वा सहा वाजता दिला होता. त्यानुसार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईजवळ असलेल्या ठाणे शहर आणि कल्याण, बदलापूर, अंबरनाथ मध्ये संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला आहे. 

हवामान विभागाचा इशारा
मुंबई हवामान विभागाने आज संध्याकाळी सव्वा सहा वाजता जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विजांचा कडकटात आणि वेगवान वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. यासोबतच मुंबई आणि आसपास ठिकाणी  काही ठिकाणी पुढील तीन ते चार तासांत जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाने दिला आहे.

Popular posts from this blog

कुळगांव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

कु ब न प सार्वत्रिक निवडणूक 2022 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्व साधारण (महिला) आरक्षण सोडत जाहीर

Ryan International School, Ambarnath celebrated the 75th Independence Day