रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना केले नेशन बिल्डर अवॉर्ड ने सन्मानित
अंबरनाथ :- अंबरनाथ मधील शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या, तसेच नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांचा विकास घडवणाऱ्या, समाजातील दुर्लक्षित घटकांना शिक्षण प्रवाहात आणणाऱ्या बारा आदर्श शिक्षकांना रोटरी क्लब अंबरनाथ स्मार्ट सिटी तर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड 2022 ने सन्मानित करण्यात आले.
कोरोना काळात बहुतांश विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता कमी झाल्यामुळे ती पूर्ववत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी ने एका विशेष प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन केले होते याप्रसंगी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला . यावेळी रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ. मयुरेश वारके मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यांनी उपस्थित असलेल्या शिक्षकांना त्याचबरोबर जमलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित करून रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत देशभरात शिक्षण क्षेत्रात मागच्या नऊ वर्षातील कार्याची माहिती दिली. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी आपल्या सभोवतालचे एक व्यक्तीला शिक्षित करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुप्रिया गोसावी ह्या सुद्धा उपस्थित होत्या व त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रसिद्ध वक्ते सदाशिव पांचाळ₹ एक मोटिवेशनल स्पीकर, माईंड ट्रेनर, कौन्सिलर) यांनी महात्मा गांधी विद्यालयातील सभागृहात आठवी ते दहावी वर्गातील 800 पेक्षा जास्त विद्यार्थी त्याचबरोबर पस्तीस पेक्षा जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी तर्फे अध्यक्ष गोकुळ पाटील माजी अध्यक्ष रो. शितल जोशी माजी अध्यक्ष रो. विशाल ठोंबरे माजी अध्यक्ष रो. डॉ. जयेश वराडे रो.संदीप पाटकर, रो. मधु यादव सचिव रो. डॉ. अविनाश नारायणकर यांनी विशेष प्रयत्न केले .या कार्यक्रमाच्या प्रकल्प प्रमुख रो. भारती बेंद्रे यांनी काम पाहिले.