वामन म्हात्रे यांची शिवसेनेतून हाकलपट्टी

बदलापूर :- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांची शिवसेनेने हकालपट्टी केली आहे याबाबतचे वृत्त शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झाले आहे. 
बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले आहे.असे वृत्त सामना मध्ये प्रसिद्ध झाले आहे. 
2009 मध्ये वामन म्हात्रे यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देत मनसेतर्फे मुरबाड विधानसभा निवडणूक लढवली होती.  त्यानंतर पुन्हा 2010 च्या नगरपालिका निवडणुकीत पुन्हा  शिवसेनेत स्वगृही परतले. 2010 च्या कुळगाव बदलापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2010 मध्ये स्वबळावर शिवसेनेला  सत्ता स्थापन करता आली नाही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत घेत नगरपालिकेत सत्ता स्थापन केली. परंतु दीड वर्षाच्या कालावधीनंतर संपन्न झालेल्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षच्या  निवडणुकीत अपक्ष नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांच्या मदतीने वामन म्हात्रे नगराध्यक्ष पदी विराजमान झाले. आशिष दामले यांनी त्यावेळी वामन म्हात्रे यांना साथ दिल्याने म्हात्रे हे शिवसेनेत पुन्हा आपले स्थान निर्माण करू शकले अशीच चर्चा त्यावेळी बदलापूरच्या राजकारणात रंगलेली होती. 
त्यानंतर 2010 मध्ये स्वगृही परतलेल्या वामन म्हात्रे यांनी मागे वळून बघितले नाही. शिवसेनेसोबत आपली घोडदौड कायम ठेवत शिवसेना आणि वामन म्हात्रे हे समीकरण बदलापूरकरांच्या  मनावर कायम केले.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. वामन म्हात्रे यांनीही काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दिला होता त्यामुळे त्यांच्यावर शिवसेना कारवाई करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती व ती शंका अखेर खरी ठरली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत, त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. 

Popular posts from this blog

कु ब न प सार्वत्रिक निवडणूक 2022 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्व साधारण (महिला) आरक्षण सोडत जाहीर

कुळगांव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Ryan International School, Ambarnath celebrated the 75th Independence Day