शिवसेने कडून हकालपट्टी तर शिंदे गटाकडून बहाली....
बदलापूर :- कुळगाव बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहर प्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर लगेच शिंदे गटाकडून त्यांची बदलापूर शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले आहे.असे वृत्त सामना मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर लगेचच अवघ्या काही तासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या बदलापूर शहर प्रमुख पदी एक वर्षकरिता वामन म्हात्रे यांची नियुक्ती केली आहे.