बदलापूर शहर शिवसेना शहर प्रमुख पदी किशोर पाटील यांची नियुक्ती
भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची यादी शिवसेना मार्फत सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतील अनेक दिग्गजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. त्याचीच पुनरावृत्ती बदलापूर शहरात होऊन शहरातील शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात पाठिंबा दर्शवला होता त्यानंतर वामन म्हात्रे यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली.
वामन म्हात्रे यांची हकालपट्टी केल्यानंतर शहर प्रमुख पदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. तर्क वितरकांना विराम देत शिवसेनेने शहर प्रमुख पदी अखेर किशोर पाटील यांची नियुक्ती केली आहे. किशोर पाटील हे निष्ठावंत शिवसैनिक असून अनेक वर्षापासून शिवसेनेत कार्य करीत आहेत. वामन म्हात्रे यांच्यासह अनेकांनी शिवसेनेस सोडचिट्टी देत शिंदे गटात पाठिंबा दिल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बदलापूर शहरात किशोर पाटील यांना पुन्हा पक्ष बांधणी करण्याचे मोठे आवाहन त्यांच्यापुढे आहे त्यामुळे आगामी काळात किशोर पाटील हे कोणत्या पद्धतीने काम करतात याकडे सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.