दसऱ्याच्या निमित्त .....येथे रात्रभर जागून सजविण्यात येतो प्रभाग


बदलापूर :- आपल्याकडे वर्षभर कितीही सण असले  तरीही दसरा -दिवाळीचे महत्त्व काही खासच आहे. दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा असे उगीच म्हटले जात नाही. या सणांवारी घर कितीही स्वच्छ असले तरीही साफ -सफाई ही केलीच जाते. विशेष म्हणजे फक्त घरातच नाही तर घराबाहेर देखील या सणांचा चांगलाच उत्साह जाणवतो. त्यामुळे एखाद्या दुकानात अथवा कोणाच्या घरी गेल्यास तिथली एखादी सजावट पाहून मनाला एकदम प्रसन्न वाटते. किंबहुना या सणांमधली जी मांगल्याची अनुभूती असते ती अधिक जाणवते.

या उद्देशातून अनेक जण आपलं घर परिसर स्वच्छ करत असते परंतु प्रभाग विकासाचा ध्यास घेतलेल्या कॅप्टन आशिष दामले  यांच्या माध्यमातून गेल्या 13 वर्षापासून बेलवली भाग संपूर्णपणे स्वच्छ करून रांगोळी आणि फुलांच्या माळांची आरास करून सजवित असतात. 


दरवर्षीप्रमाणे यंदाही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या सणाचे औचित्य साधून बेलवली भागात सजावट करण्यात आली आहे. रांगोळ्या, फुलांच्या माळा, तोरणे बांधून या सणाचे स्वागत करण्यात आले आहे. रात्रभर जागून पहाटेपर्यंत सजावट, रांगोळी काढण्याचे  सुरू असते. अतिशय उत्साहात सर्वजण एकत्र येऊन आम्ही  प्रभाग सजवत असतात. सणाच्या निमित्ताने भल्या पहाटे सजलेला प्रभाग बघून नागरिकांनाही अतिशय प्रसन्न वाटते. 

वाईट गोष्टींवर मात करून चांगल्या विचारांचे सोने लुटण्याचा आजचा हा सण. दसऱ्याच्या निमित्ताने सीमोल्लंघन करतांना आपणा सर्वांच्या आयुष्यात सौख्य, समृद्धी येवो ही प्रार्थना. दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! अशा शुभेच्छा याप्रसंगी दामले यांनी दिलेल्या आहेत. 


#Loyalty

#Badlapur

#NCP

#एकनिष्ठ

#फक्त_राष्ट्रवादी⏰


  

Popular posts from this blog

कु ब न प सार्वत्रिक निवडणूक 2022 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्व साधारण (महिला) आरक्षण सोडत जाहीर

कुळगांव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Ryan International School, Ambarnath celebrated the 75th Independence Day