कुळगांव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
बदलापूर :- कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम देण्यात आलेला आहे. कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता "नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिला" यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २८ जुलै रोजी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसी आरक्षणाला मान्यता दिल्यानंतर आता नगरपालिकांमधील प्रभाग आरक्षणात ओबीसींचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अ वर्ग नगरपालिका असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर पालिकांमध्ये येत्या २८ जुलै रोजी ओबीसी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये पुन्हा धाकधुक वाढली आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेत १३ जागांसाठी सोडत काढली जाणार आहे. बदलापूर पूर्व भागातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या श्री जी सभागृह, दुसरा माळा, श्रीजी कॉम्प्लेक्स, कात्रप बदलापूर (पूर्व ) जि. ठाणे येथे दि. २८/०७/२०२२ रोजी...