उद्या (दि. १७) बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्र गीताचे सामूहिकपणे गायन

राज्यात उद्या (दि. १७) बुधवारी सकाळी ११ वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचे गायन होणार आहे. यासाठी नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या "स्वराज्य महोत्सवाचे” आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गत हे सामूहिक राष्ट्रगीतगायन राबवण्यात आले आहे.
राज्यात या उपक्रमाची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी दिली. राज्य शासनाने सामूहिक राष्ट्रगीत गायना या बाबत शासनाकडून सविस्तर निर्णय जारी करण्यात आला आहे. तसेच सांस्कृतीक कार्य मंत्रालयाच्यावतीने यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे.
या सामूहिक उपक्रमात राज्यातील सर्व अबाल वृद्धांनी सहभागी व्हावे आणि नवा विक्रम नोंदवावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. हा उपक्रम प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.


Popular posts from this blog

कथित दरोड्या प्रकरणी न्यायालयाने आशिष दामले यांच्या सह १८ जणांची केली निर्दोष मुक्तता; दोषी ठरवलेल्या प्रकरणात प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स ऍक्ट अनव्ये केली 15 हजारांच्या जात मुचल्यावर सुटका

कुळगांव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

50 खोके, महाराष्ट्राला देतात धोके :- वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावरून राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे आंदोलन; बदलापुरात कार्यकर्ते आक्रमक