Posts

कथित दरोड्या प्रकरणी न्यायालयाने आशिष दामले यांच्या सह १८ जणांची केली निर्दोष मुक्तता; दोषी ठरवलेल्या प्रकरणात प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स ऍक्ट अनव्ये केली 15 हजारांच्या जात मुचल्यावर सुटका

Image
* बदलापूर :- बदलापूर येथील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व मा. नगरसेवक  कॅप्टन आशिष दामले यांच्या विरोधात दंगल आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल आला असून कथित दरोड्या प्रकरणी न्यायालयाने आशिष दामले यांच्या सह १८ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश शौकत गोरवाडे न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी  नुकतीच संपन्न झाली. या प्रकरणाचा निकाल देताना न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी कॅप्टन आशिष दामले यांना भा. दं. वि. कलम ३२३,४२७ ४५२, व १४९ सह या आरोपाखाली दोषी ठरविण्यात आले असून तूर्तास कोणतीही शिक्षा न करता १५ हजारांच्या जात मुचल्यावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तीन वर्षांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे व शांतता भंग न करण्याचे आदेश दिले आहेत. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आशिष दामले व त्यांच्या सहकार्यांवर ३९५ (दरोडा) व ३६३ (अपहरण) सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु हा गुन्हा राजकीय दबावापोटी दाखल करण्यात आला असल्याचा आरोप कॅप्टन आशिष दामले यांनी क...
Image

दसऱ्याच्या निमित्त .....येथे रात्रभर जागून सजविण्यात येतो प्रभाग

Image
बदलापूर :- आपल्याकडे वर्षभर कितीही सण असले  तरीही दसरा -दिवाळीचे महत्त्व काही खासच आहे. दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा असे उगीच म्हटले जात नाही. या सणांवारी घर कितीही स्वच्छ असले तरीही साफ -सफाई ही केलीच जाते. विशेष म्हणजे फक्त घरातच नाही तर घराबाहेर देखील या सणांचा चांगलाच उत्साह जाणवतो. त्यामुळे एखाद्या दुकानात अथवा कोणाच्या घरी गेल्यास तिथली एखादी सजावट पाहून मनाला एकदम प्रसन्न वाटते. किंबहुना या सणांमधली जी मांगल्याची अनुभूती असते ती अधिक जाणवते. या उद्देशातून अनेक जण आपलं घर परिसर स्वच्छ करत असते परंतु प्रभाग विकासाचा ध्यास घेतलेल्या कॅप्टन आशिष दामले  यांच्या माध्यमातून गेल्या 13 वर्षापासून बेलवली भाग संपूर्णपणे स्वच्छ करून रांगोळी आणि फुलांच्या माळांची आरास करून सजवित असतात.  दरवर्षीप्रमाणे यंदाही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या सणाचे औचित्य साधून बेलवली भागात सजावट करण्यात आली आहे. रांगोळ्या, फुलांच्या माळा, तोरणे बांधून या सणाचे स्वागत करण्यात आले आहे. रात्रभर जागून पहाटेपर्यंत सजावट, रांगोळी काढण्याचे  सु...

शितल म्हात्रे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेस आक्रमक

Image
बदलापूर :-  दोन वेगवेगळे फोटो जोडून चुकीच्या पद्धतीने पोस्ट करून खा. सुप्रिया सुळे  प्रतिमा मलीन करण्याच्या स्पष्ट हेतू या फोटोतून दिसत आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करावी तसेच शीतल म्हात्रे यांनी सुप्रियाताईंची माफी मागून पोस्ट डिलीट करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे  केली आहे.  यावेळी महिलाध्यक्ष अनिताताई पाटील, अनिसाताई खान, सोनलताई मराडे, हर्षालीताई गायकवाड, शिल्पा खंडागळे, मानसी गांगुर्डे आदि महिला उपस्थित होत्या.

50 खोके, महाराष्ट्राला देतात धोके :- वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावरून राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे आंदोलन; बदलापुरात कार्यकर्ते आक्रमक

Image
बदलापूर :- वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलविण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने घोरपडे चौक  कात्रप येथे आज   (23 सप्टेंबर) आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती काँग्रेस, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर शहर आणि ठाणे जिल्हा ग्रामीण च्या  कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत राज्यसरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.‘गद्दारांना 50 खोके, महाराष्ट्राला देतात धोके’,‘ ईडी सरकार हायहाय’,‘गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी’ अशाप्रकारची घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रियंका दामले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व अविनाश देशमुख, युवक अध्यक्ष विनय सरदार, संतोष कदम, जितेंद्र पाटील, युवती काँग्रेस च्या हर्षाली गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.  काय म्हणाल्या प्रियंका आशिष दामले ? एक ते दीड लाख रोजगा...

बदलापूर शहर शिवसेना शहर प्रमुख पदी किशोर पाटील यांची नियुक्ती

Image
                                                     संग्रहित चित्र  बदलापूर :- बदलापूर शहर शिवसेना शहर प्रमुख पदी किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे वृत्त शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनाने प्रसिद्ध केले आहे.  भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची यादी शिवसेना मार्फत सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतील अनेक दिग्गजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. त्याचीच पुनरावृत्ती बदलापूर शहरात होऊन शहरातील शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात पाठिंबा दर्शवला होता त्यानंतर वामन म्हात्रे यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली.  वामन म्हात्रे यांची हकालपट्टी केल्यानंतर शहर प्रमुख पदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. तर्क वितरकांना विराम देत शिवसेनेने शहर प्रमुख पदी...

मनविसेच्या जिल्हाध्यक्षपदी धनंजय गुरव यांची नियुक्ती!

Image
मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी दिलं नियुक्तीपत्र ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर अंबरनाथ : मनसे विद्यार्थी सेनेच्या कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्षपदी धनंजय गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी आज नियुक्तीपत्र देत गुरव यांची नियुक्ती जाहीर केली. धनंजय गुरव हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असून २००७ पासून त्यांच्यावर मनविसेच्या अंबरनाथ शहराध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यांच्या १५ वर्षांच्या शहराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अंबरनाथ शहरात विद्यार्थीहितासाठी अनेक उपक्रम राबवले, तसेच अनेक आक्रमक आंदोलनेही केली. अमित राज ठाकरे यांनी मनसेच्या विद्यार्थी सेना अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच त्यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांचा दौरा केला होता. यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. तेव्हापासूनच ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची फेररचना होणार असल्याची चर्चा होती. अखेर आज राजगड या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात धनंजय गुरव यांना कल्याण लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष म्हणून बढ...