Posts

Showing posts from September, 2022

शितल म्हात्रे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेस आक्रमक

Image
बदलापूर :-  दोन वेगवेगळे फोटो जोडून चुकीच्या पद्धतीने पोस्ट करून खा. सुप्रिया सुळे  प्रतिमा मलीन करण्याच्या स्पष्ट हेतू या फोटोतून दिसत आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करावी तसेच शीतल म्हात्रे यांनी सुप्रियाताईंची माफी मागून पोस्ट डिलीट करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे  केली आहे.  यावेळी महिलाध्यक्ष अनिताताई पाटील, अनिसाताई खान, सोनलताई मराडे, हर्षालीताई गायकवाड, शिल्पा खंडागळे, मानसी गांगुर्डे आदि महिला उपस्थित होत्या.

50 खोके, महाराष्ट्राला देतात धोके :- वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावरून राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे आंदोलन; बदलापुरात कार्यकर्ते आक्रमक

Image
बदलापूर :- वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलविण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने घोरपडे चौक  कात्रप येथे आज   (23 सप्टेंबर) आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती काँग्रेस, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर शहर आणि ठाणे जिल्हा ग्रामीण च्या  कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत राज्यसरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.‘गद्दारांना 50 खोके, महाराष्ट्राला देतात धोके’,‘ ईडी सरकार हायहाय’,‘गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी’ अशाप्रकारची घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रियंका दामले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व अविनाश देशमुख, युवक अध्यक्ष विनय सरदार, संतोष कदम, जितेंद्र पाटील, युवती काँग्रेस च्या हर्षाली गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.  काय म्हणाल्या प्रियंका आशिष दामले ? एक ते दीड लाख रोजगा...

बदलापूर शहर शिवसेना शहर प्रमुख पदी किशोर पाटील यांची नियुक्ती

Image
                                                     संग्रहित चित्र  बदलापूर :- बदलापूर शहर शिवसेना शहर प्रमुख पदी किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे वृत्त शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनाने प्रसिद्ध केले आहे.  भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची यादी शिवसेना मार्फत सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतील अनेक दिग्गजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. त्याचीच पुनरावृत्ती बदलापूर शहरात होऊन शहरातील शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात पाठिंबा दर्शवला होता त्यानंतर वामन म्हात्रे यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली.  वामन म्हात्रे यांची हकालपट्टी केल्यानंतर शहर प्रमुख पदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. तर्क वितरकांना विराम देत शिवसेनेने शहर प्रमुख पदी...

मनविसेच्या जिल्हाध्यक्षपदी धनंजय गुरव यांची नियुक्ती!

Image
मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी दिलं नियुक्तीपत्र ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर अंबरनाथ : मनसे विद्यार्थी सेनेच्या कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्षपदी धनंजय गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी आज नियुक्तीपत्र देत गुरव यांची नियुक्ती जाहीर केली. धनंजय गुरव हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असून २००७ पासून त्यांच्यावर मनविसेच्या अंबरनाथ शहराध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यांच्या १५ वर्षांच्या शहराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अंबरनाथ शहरात विद्यार्थीहितासाठी अनेक उपक्रम राबवले, तसेच अनेक आक्रमक आंदोलनेही केली. अमित राज ठाकरे यांनी मनसेच्या विद्यार्थी सेना अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच त्यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांचा दौरा केला होता. यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. तेव्हापासूनच ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची फेररचना होणार असल्याची चर्चा होती. अखेर आज राजगड या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात धनंजय गुरव यांना कल्याण लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष म्हणून बढ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तकपिल पाटील यांच्याकडून १२ अंगणवाडी दत्तक

Image
भिवंडी लोकसभा मतदारसंघात ७२ हजार झाडे लावणार भिवंडी,  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून १२ अंगणवाडी व क्षय रोगाचे १०० रुग्ण दत्तक घेण्यात आल्या आहेत. या अंगणवाड्यांमधील सर्व मुलांना दर्जेदार सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकसभा क्षेत्रात सुमारे ७२ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून पाळला जात आहे. त्यानुसार भाजपा ठाणे ग्रामीण महिला मोर्चाच्या वतीने भिवंडी तालुक्यातील सरवली येथील अंगणवाडी दत्तक घेण्यात आली आहे. त्यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील बोलत होते. या वेळी आमदार व महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रेया गायकर, पंचायत समितीचे सभापती सुरेंद्र भोईर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रविना जाधव आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी पंचायत समितीच्या आरोग्य...

शिवसेने कडून हकालपट्टी तर शिंदे गटाकडून बहाली....

Image
बदलापूर :- कुळगाव बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहर प्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर लगेच शिंदे गटाकडून त्यांची बदलापूर शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.   बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले आहे.असे वृत्त सामना मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर लगेचच अवघ्या काही तासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या बदलापूर शहर प्रमुख पदी  एक वर्षकरिता वामन म्हात्रे यांची नियुक्ती केली आहे. 

वामन म्हात्रे यांची शिवसेनेतून हाकलपट्टी

Image
बदलापूर :- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांची शिवसेनेने हकालपट्टी केली आहे याबाबतचे वृत्त शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झाले आहे.  बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले आहे.असे वृत्त सामना मध्ये प्रसिद्ध झाले आहे.  2009 मध्ये वामन म्हात्रे यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देत मनसेतर्फे मुरबाड विधानसभा निवडणूक लढवली होती.  त्यानंतर पुन्हा 2010 च्या नगरपालिका निवडणुकीत पुन्हा  शिवसेनेत स्वगृही परतले. 2010 च्या कुळगाव बदलापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2010 मध्ये स्वबळावर शिवसेनेला  सत्ता स्थापन करता आली नाही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत घेत नगरपालिकेत सत्ता स्थापन केली. परंतु दीड वर्षाच्या कालावधीनंतर संपन्न झालेल्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षच्या  निवडणुकीत अपक्ष नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांच्य...

रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना केले नेशन बिल्डर अवॉर्ड ने सन्मानित

Image
अंबरनाथ :- अंबरनाथ मधील शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या, तसेच नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांचा विकास घडवणाऱ्या, समाजातील दुर्लक्षित घटकांना शिक्षण प्रवाहात आणणाऱ्या बारा आदर्श शिक्षकांना रोटरी क्लब अंबरनाथ स्मार्ट सिटी तर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड 2022 ने सन्मानित करण्यात आले.  कोरोना काळात बहुतांश विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता कमी झाल्यामुळे ती पूर्ववत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी ने एका विशेष प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन केले होते याप्रसंगी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला . यावेळी रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ. मयुरेश वारके मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यांनी उपस्थित असलेल्या शिक्षकांना त्याचबरोबर जमलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित करून रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत देशभरात शिक्षण क्षेत्रात मागच्या नऊ वर्षातील कार्याची माहिती दिली. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी आपल्या सभोवतालचे एक व्यक्तीला शिक्षित करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी म...

कंत्राटी सफाई कामगार पगार घोटाळ्याची चौकशी करा : मनसेची मागणी

Image
बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांना त्यांचा हक्काचा पगार, भत्ते व देय असलेल्या इतर सोयीसुविधा न देता त्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप करून कंत्राटी सफाई कामगारांच्या पगार घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे.        कंत्राटी सफाई कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती देण्यासाठी मनसेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे जिल्हा संघटक उमेश तावडे व महिला  शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांनी कंत्राटी सफाई कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करून मनसे कंत्राटी सफाई कामगारांच्या पाठिशी ठामपणे उभी राहणार असल्याचे स्पष्ट केले. कंत्राटी सफाई कामगारांना २१ हजार ५०० रुपये पगार आहे. पीएफ व इतर कापून घेऊन त्यांच्या खात्यात दरमहा १६ हजार ५०० रुपये जमा केले जातात. आणि ठेकेदाराच्या माणसांमार्फत या कामगारांना कामावरून कमी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ७ हजार रुपये कॅशने घेतले जातात, असे उमेश तावडे यांनी सांगितले. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करू नय...

भातुकली खेळाचे महत्व सांगणारा बालगणेश

Image
बदलापुरातील नरेकर कुटुंबियांनी साकारला भातुकलीचा देखावा   बदलापूरः मोबाईल, इंटरनेटच्या युगात पारंपरिक खेळांचे महत्व कमी होऊ लागले आहे. आयुष्याला आकार देणारे भातुकलीसारखे खेळ विस्मरणात जात असताना या खेळांना नवसंजीवनी देणारे प्रयत्न होण्याची गरज आहे. हीच गरज ओळखून बदलापुरातील नरेकर कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात भातुकली खेळणाऱ्या बालगणेशाचा देखावा साकारला आहे. बाल गणेश आणि उंदीर दोघेही भातुकलीचा खेळ खेळणारी सुबक मुर्ती या देखाव्याचे आकर्षण ठरते आहे.   गेली 22 वर्ष घरगुती गणेशोत्सवासोबतच सामाजिक संदेश देण्याची परंपरा बदलापुरातील नरेकर कुटुंबियांनी जोपासली आहे. यंदाच्या वर्षात या कुटुंबाने भातुकली खेळणाऱ्या बाल गणेशाचा देखावा साकारला आहे. या देखाव्यात बाल गणेश आणि त्याचे वाहन असलेला मूषक दोघे भातुकलीचा खेळ खेळत आहेत. या देखाव्यात मागे भातुकलीची भांडी असलेली मांडणी असून चारही बाजूंना भातुकली पसरलेली आहे. गेल्या काही वर्षात पारंपरिक  खेळांचे महत्व कमी होते आहे. त्यात भातुकली या खुप जुन्या आणि  महत्वाच्या खेळाचाही समावेश आहे. आजच्या लहानग्यांना भातुकली  ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित रोजगार मेळाव्याला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद

Image
बदलापूर: बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात नाव नोंदणी केलेल्या १५० पैकी ८० उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात आले आहे.          बदलापूर पश्चिमेकडील बेलवली येथील अनंत भवनमध्ये रविवारी (ता.४) सकाळी १० ते दुपारी 3 वा. दरम्यान हा रोजगार मेळावा संपन्न झाला. राष्ट्रवादीच्या ठाणे -पालघर विभागीय  महिला अध्यक्ष ऋता आव्हाड यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यात दहावी बारावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुण तरुणींसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी १५० तरुण तरुणींनी नावनोंदणी केली होती. पहिल्या टप्प्यात संबंधित अस्थापनांच्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रे तपासली. त्यानंतर वेगवेगळ्या पदांसाठी त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ८०  उमेदवारांची निवड करून त्यांना नोकरीसाठी ऑफर लेटर देण्यात आले. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बदलापूर परिसरातील तरुण तरुण...